Nanukaka

नानूकाका मध्ये अधिक महिन्याची मिठाई (डोंबिवली )

Mysore Pak by Nanukaka
Traditional Crispy Mysore Pak

Adhik Mahina Sweets at Nanukaka – अधिक महिना आला म्हणजे जावयांना घरी बोलावून त्यांना आशीर्वाद व गोड धोड देण्याचा महिना. अडीज वर्षा हुन अधिक कालावधी नंतर आल्या मुळे हा आनंद सगळ्यांनाच घ्यावासा वाटतो. डोंबिवली मधील नानूकाका मध्ये ह्या आनंदाच्या समयी, अधिक मासाचे अनेक घरगुती खाद्य पदार्थ उपलब्ध होतात.

घरगुती,  गुळाचे, खसखस घातलेले, साजूक तुपात तळलेले, ‘खुसखुशीत-कुरकुरीत अनारसे’ नानूकाका मध्ये मिळतात. त्याच बरोबर, ज्यांना ह्या अनारस्याना अधिक घरगुती स्वरूप द्यायचे असते त्यांच्यासाठी नानूकाका मध्ये ‘तयार अनारसे पीठ’ उपलबद्घ असते .
म्हैसूर पाक ह्या मिठाई ला अधिक महिन्यात जावयांना भेट देण्याची प्रथा आहे.  नानूकाका चा साजूक तूप असलेला, सुप्रसिद्ध पारंपारिक म्हैसूर पाक हा कायम उपलब्ध असतो.

जावयांना वेगळे काय द्यायचे हा प्रश्ण घरात सगळ्यांनाच असतो. तर नानूकाका चे पाकातले चिरोटे, ओल्या नारळाची करंजी, नारळ वडी, खजूर बर्फी व इतर अनेक गॉड पदार्थ ह्या अधिक मासा मध्ये उपलब्ध असतात.

घरी जेवणाच्या पानात, नरसोबाच्या वाडीची बासुंदी, सीताफळ राबडी व फ्रुटखंड असे अविस्मरणीय पदार्थ वाढून जेवणाची चव वाढवा. हे पदार्थ नानूकाका मध्ये कायम मिळतात.

ह्या वर्षी न चुकता डोंबिवली पश्चिम मधील नानूकाका मध्ये अधिक महिन्याच्या विविध घरगुती मिठायांचा आस्वाद घ्या .

Exit mobile version